जालना : आष्टी येथे चाकूचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुटले, चोरट्यांचा ६ लाखांवर डल्ला

Foto

जालना : आष्टी येथे चाकूचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुटले, चोरट्यांचा ६ लाखांवर डल्ला

जालना- परतूर तालुक्यातील आष्टी येथील व्यापारी श्रीराम देविदास ढोके यांच्या घरी पहाटे पावणे तीनच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी सुमारे ६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलिसांच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद करुन आंदोलन केले.

रात्रीचा फायदा घेत चार अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. अज्ञात चार व्यक्तींविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इज्जपवार करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आष्टी व परिसरात चोरी होण्याची ही तीसरी वेळ आहे. मात्र द्यापही आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश आले नाही. यावेळी व्यापारी वर्गाने पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदवत ठिय्या आंदोलन केले. पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांनीही घटनास्थऴी भेट दिली.